पूर्णानंद महिला मंच कणकवली यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

सामाजिक कार्यकर्ते सुरेश परुळेकर यांनी केले उद्घाटन
पूर्णानंद महिला मंचाच्या स्थानांतरित कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच दानशूर सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेश परुळेकर यांच्या हस्ते झाले. हे कार्यालय आजपासून सह्याद्री हॉटेल नजिकच्या एकदंत प्लाझा येथे चौथ्या मजल्यावर स्थानांतरित झाले आहे.
उद्घाटन प्रसंगी मंडळाच्या कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, सल्लागार सौ. मालिनी तिरोडकर, सौ. सुरेखा परुळेकर, प्रभू, सौ. प्रभू, आदींची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, फीत कापून आणि दीप प्रज्वलन करून नवीन कार्यालयात सर्वांनी प्रवेश केला. त्यानंतर श्रीमत् पूर्णानंद स्वामी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थितांना गोड वाटून सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा स्वीकारल्या.
या प्रसंगी सौ. सुरेखा महाजन, स्नेहा तेंडुलकर, सुलभा सामंत, सुनेत्रा आजगावकर, मृणाल ठाकूर, नम्रता आणि प्रणिता सामंत, मनीषा देसाई, स्मिता खानोलकर, हर्षदा गवाणकर, स्मिता केळुसकर, नीता तेंडुलकर, शर्वरी आजगावकर, सपना देसाई, विनया खानोलकर, लीना केळुसकर, गौरी तारळेकर, सेजल सामंत, प्राजक्ता केळुसकर, श्रुती केळुसकर, लीशां ठाकूर, ॲड. एन आर देसाई, संदीप ठाकूर, प्रसन्ना देसाई, बाबुराव सामंत, महेश प्रभू, श्री. महाजन, सुनील तेंडुलकर, सुनील गुरुनाथ आजगावकर आदी मंडळी शुभेच्छा देण्यासाठी हजर होते.





