सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांचे सर्वच प्रकल्प बंद पडतात

एलईडी मच्छीमारांना पालकमंत्री व सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा
माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आरोप
पालकमंत्री नितेश राणे यांनी आतापर्यंत घोषणा केले ते सर्व प्रकल्प सुरू होतात आणि बंद पडतात. त्याच्यावर आता पालकमंत्री नितेश राणेंनी लक्ष देण्याची गरज आहे. नवीन सुरू केलेल्या बोटीचे तिकीट जास्त असल्याने एकदाही 50 चा आकड्यावरती प्रवासी आकडा गेला नाही. प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने त्या बोटीची हालत झालेली आहे. डिझेल चे दर वाढलेले दर पाहता मच्छीमार संस्थांना 26 रुपये अतिरिक्त रक्कम भरावी लागत आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे एलईडी मच्छिमारी मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. म्हणून मालवण आणि देवगड मधल्या सर्वांनी या डिझेलच्या कारणामुळे पुढील दोन महिने मच्छीमारी बंद पडेल अशा प्रकारची भीती निर्माण केली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्यातील नागरिकांना मासे मासे मिळू शकणार नाही. ज्याप्रमाणे आंब्याच्या बाबतीत बारामती मधील टेक्निकल टीम ला बोलवणार अस सांगितलं त्याच प्रमाणे या मच्छीमारांना 26 रुपयाचा फरक आहे तो मच्छीमार संस्थेला डिझेलचा फरक जिल्हा नियोजन बैठकीत जिल्हा नियोजन मधून देण्यात यावा. म्हणजे मच्छीमारांना पेट्रोल पंपावर मिळणारे 92 रुपयाचे डिझेल 144 रुपये घ्यावे लागते. त्यामुळे संस्था आणि पारंपारिक मच्छीमार यामुळे टिकू शकतील. एलईडी मासेमारीला पालकमंत्री आणि सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. असा आरोप उपरकर यांनी केला आहे.






