“काजू -बी ला राज्य शासनाने हमीभाव देण्यात यावा ” विरोधीपक्षनेते अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र.

सावंतवाडी प्रतिनिधि
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ.अर्चना घारे यांनी काजू बी च्या हमीभावासंदर्भात विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचे लक्ष वेधल्यानंतर अजितदादा पवार यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांना काजू दिला हमीभाव जाहीर करण्याची मागणी केली आहे.
“तळ कोकणातील शेतकरी प्रामुख्याने काजू बी , सुपारी, नारळ उत्पादनावर अवलंबून आहे. या काजू – बी ला गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के कमी भाव मिळत आहे. याबाबत राज्य शासनाने ठोस पावले उचलत या शेतकऱ्यांना दिलासादायक असा हमीभाव जाहीर करणे आवश्यक आहे. ज्यातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य प्रमाणात उत्पन्न मिळेल. दिवसेंदिवस हवामानात होणारे बदल, गारपीट ,अवकाळी पाऊस यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यात हमीभाव नसल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यास आपण दिलासा द्यावा, अशी मागणी आदरणीय अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रकाद्वारे केली आहे. अशी माहिती सौ.अर्चना घारे ,कोकण विभागीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.