शरद कदम यांचे निधन

मूळ गढीताम्हणे ता. देवगड येथील रहिवासी व सध्या कणकवली-निमेवाडी येथे स्थायिक असलेले श्री. शरद मुरलीधर कदम(७४) यांचे मंगळवारी ११ एप्रिल रोजी रात्री राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,मुलगी,जावई, नातवंडे, भाऊ-बहिणी असा मोठा परिवार आहे.एसटी महामंडळ कणकवली आगाराचे ते निवृत्त कर्मचारी होते.
ज्येष्ठ पत्रकार राजन कदम यांचे ते ज्येष्ठ बंधू तर बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी प्रकाश कदम यांचे ते वडील होत.
कणकवली प्रतिनिधी