लिंगायत समाज स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ

नगरपंचायत च्या माध्यमातून ५३ लाखांचा निधी मंजूर
नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे समाज बांधवांकडून आभार व्यक्त
कणकवली शहरातील लिंगायत समाज स्मशानभूमी सुशोभीकरण करणे या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते आज करण्यात आला. हे काम करण्याची मागणी लिंगायत समाज बांधवांकडून करण्यात येत होती. याकरिता नगरपंचायत च्या माध्यमातून 53 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. लिंगायत समाज बांधवांकडून गेले अनेक वर्ष याबाबत सातत्याने मागणी होत असताना हे काम मंजूर करून लिंगायत समाज बांधवांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे यावेळी श्री. नलावडे यांनी सांगितले. या कामाच्या शुभारंभ प्रसंगी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेविका मेघा सावंत, विराज भोसले, महेश सावंत, अध्यक्ष श्रीरंग पारगावकर, ज्येष्ठ नागरिक दीपक टकले, सुहासिनी टकले, सचिन टोणेमारे, राजू सरुडकर, निखिल घेवारी, मिथुन मिठारे, अमित टकले, प्रिया सरुडकर, स्वाती टकले आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली