नेरूर येथे उद्या मोफत महाआरोग्य शिबिर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन

कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र,नेरूर येथे बेळगाव येथील के. एल. ई. हॉस्पिटलच्या 142 डॉक्टर- स्टाफ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सर्व रोगावरची तपासणी उपचार यांचा समावेश असलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. याचे उदघाटन उद्या २८ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व आयुष्यमान भारतचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या शुभहस्ते सकाळी 9.30 वाजता होणार आहे.
या उद्घाटन समारंभाला कुडाळ मालवणचे विद्यमान आमदार निलेश राणे, बॅ.नाथ पै फाऊडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा अदिती पै, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडपिसे, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जि. प. उपाध्यक्ष दादा साईल, माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, जि प सदस्य रुपेश पावसकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनिल नेरूरकर, के. एल. ई. चे डॉ. माधव प्रभू, के. एल. ई. चे संचालक डॉ.अमल्लप्रभू कुडचे, मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत -प्रभावळकर, जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील, कुडाळ चा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे,कुडाळचे तहसिलदार सचिन पाटील, अजित शिरोडकर, गौड ब्राह्मण सभेच्या राजश्री सामंत, कुडाळ पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, कुडाळ पंचायत समिती सदस्या(नेरूर) दीप्ती नाईक ,नेरुर सरपंच भक्ती घाडीगावकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेची चेअरमन उमेश गाळवणकर उपस्थित राहणार आहेत. या मोफत आरोग्य शिबिराचा सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे.

error: Content is protected !!