सिंधुदुर्गात टोल वसुलीच्या अद्याप हालचाली नाहीत

कोल्हापुर येथील क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून देखील दुजोरा

जनतेच्या विरोधानंतर नियुक्त ठेकेदार कंपनीने थांबवली होती टोल वसुली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव येथे महामार्गावर असलेला टोल नाका सुरू करण्याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली सुरू नसून, या टोल नाक्यावरील वसुली टोल वसुलीचे कंत्राट ज्या गणेश घरीया या कंपनीला देण्यात आले होते तिला सहा महिन्यांची मुदत होती. अशी माहिती कोल्हापूर कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी पंदरकर यांनी दिली. महामार्गा वरील हतिवले येथील टोलनाका सुरू केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोल नाका देखील सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. परंतु अशा अद्याप कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचे श्री. पंदरकर यांनी सांगितले. संबंधित ठेकेदार कंपनीला टोल वसुलीचे कंत्राट देण्यात आले आहे. परंतु ठेकेदार कंपनीकडून अशा प्रकारे वसुली बाबत अद्याप कोणती हालचाल करण्यात आली नसल्याचे श्री पंदरकर यांनी सांगितले. टोल वसुलीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचा विरोध असून, जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी देण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर एमडी करीमुन्नीस या टोल वसुली करता नियुक्त केलेल्या टोल कंपनीला टोल वसुली शिवाय मुदत संपल्याने माघारी फिरावे लागले होते. त्यानंतर नव्याने टेंडर काढत गणेश घरीया ठिकेदार कंपनीची नियुक्ती करण्यात आली. मात्र जनतेच्या तीव्र विरोधानंतर या कंपनीने देखील अद्याप पर्यंत वसुली केलेली नाही. त्यामुळे आता हातिवले ची टोल वसुली सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्गात काय होणार ? याची उत्सुकता लागून राहिली होती. परंतु सिंधुदुर्गात अद्याप अशा टोल वसुली करण्याच्या हालचाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या नियुक्त केलेल्या ठेकेदार कंपनीची मुदत संपल्यानंतर पुन्हा नव्याने ठेकेदार नियुक्ती करिता टेंडर काढून नवीन ठेकेदार कंपनी टोल वसुली करता नियुक्त करावी लागण्याची शक्यता आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!