कुडाळमध्ये दुमदुमला वीर सावरकरांचा आवाज !
कुडाळ : स्वामी समर्थ प्रतिष्ठान, कुडाळ, देशप्रेमी नागरिक मंच आणि शिवप्रेमी संघटना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज सायंकाळी कुडाळ येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव यात्रा काढण्यात आली. या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
येथील राजमाता जिजाऊ चौक यांच्या स्मारकाकडून या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेचा समारोप बाबा वर्दम स्मृती रंगमंच, कुडाळ येथे करण्यात आला. या यात्रेला सावरकरप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘देशाचा सन्मान वीर सावरकर’, ‘मी सावरकर’, ‘आम्ही सावरकर’ असा जयघोष या गौरव यात्रेदरम्यान करण्यात आला. या गौरव यात्रेत मिलिंद देसाई, राजू राऊळ, योगेश तुळसकर, रमाकांत नाईक, विवेक पंडीत, विवेक मुतालिक, दादा साईल, अजय शिरसाट, बंड्या सावंत, विष्णू खोबरेकर, डाॅ. अभय सावंत, रूपेश कानडे, सीए अशोक सारंग, गणेश भोगटे, विलास कुडाळकर, हेमंत जाधव, संध्या तेरसे, उषा आठल्ये, कविता कुंटे, अंजली मुतालिक, अरविंद करलकर, नंदीता पाटकर, अदिती सावंत, अक्षता कुडाळकर, विशाखा कुलकर्णी, देवेंद्र सामंत आदींसह सावरकर प्रेमी व नागरीक सहभागी झाले होते.
प्रतिनिधी, कुडाळ