संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये स्पार्क मिंडा कंपनी अंतर्गत ५१ विद्यार्थ्यांची निवड

संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथे पुणे येथील नामांकित औद्योगिक समूह “स्पार्क मिंडा” यांच्या वतीने नुकताच आयोजित करण्यात आलेला कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. या भरती प्रक्रियेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ११ इंजिनिअरिंग महाविद्यालय चे एकूण ४१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ५१ विद्यार्थ्यांची कौशल्य चाचणी व मुलाखती अंतर्गत अंतिम निवड केली. या कॅम्पस ड्राइव्हमध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूट चे १७ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड झाली असून त्यात यांत्रिकी अभियांत्रिकीचे १०, विद्युत अभियांत्रिकीचे ६ आणि इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकीचा १ विद्यार्थी समाविष्ट आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दि. १५ जून २०२६ रोजी कंपनीत रुजू होण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २.४ लाख प्रतिवर्ष असे आकर्षक वेतन पॅकेज देण्यात येणार आहे.

या यशस्वी कॅम्पस ड्राइव्हसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट चे प्रमुख प्रा. आशिष पाटील, विभाग समन्वयक प्रा. सुशांत पाटोळे, प्रा.प्रथमेश गोंधळी, प्रा. भाग्यश्री भालकर व संदीप पिंपळे यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या काटेकोर नियोजन, समर्पित प्रयत्न आणि उत्कृष्ट समन्वयामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला. तसेच या भरती प्रकिया साठी विभाग प्रमुख प्रा. प्रशांत पाटील, प्रा. नितीन पाटील, प्रा. रईसा मुल्ला, अकॅडमीक कॉर्डिनेटर प्रा. रविंद्र धोंगडी यांचे सहकार्य लाभले. या यशस्वी आयोजनासाठी इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी, यांचे मोलाचे योगदान लाभले.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!