नाईक मराठा मंडळातर्फे 14 रोजी कुडाळ येथे गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांच्या ग्रंथांचे पुनर्प्रकाशन

पहिले शिवचरित्रकार गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांच्या लिखित साहित्या च्या 11 खंडांच्या पुनर्प्रकाशन सोहळ्याचे आयोजन 14 एप्रिल रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे नाईक मराठा मंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष सुनील सांगेलकर तसेच मुंबईतील वरिष्ठ पत्रकार किरण नाईक
यांनी ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळातर्फे गुरुवर्य केळुस्कर यांच्या साहित्याचे हे 11 खंड तयार करण्यात आले होते. गुरुवर्य कै कृष्णराव केळुसकर यांच्या ग्रंथसंपादाचे संपादन करणारे प्राध्यापक राजन गवस आणि महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधन प्रकाश समितीचे प्राध्यापक दिनेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये 14 एप्रिल रोजी कुडाळत हा कृष्णराव केळुसकर ग्रंथसंपदा पुनर्प्रकाशन सोहळा होणार आहे
गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी 1883 ते 1935 या काळात विपुल लेखन केले सुमारे 23 चरित्रे त्यांनी लिहिली पहिले शिवचरित्रकार म्हणून गुरुवर्य यांची ओळख आहे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी गुरुवर्यांनी मदत केली होती नाईक मराठा मंडळ मुंबई यांच्या वतीने हा कृष्णराव केळुस्कर ग्रंथ संपदा पुनर्प्रकाशन सोहळा 14 रोजी कुडाळ मध्ये होत आहे.

कुडाळ / ब्युरोन्यूज

error: Content is protected !!