श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण तसेच कॉक्रिटीकरण करणे अत्यंत आवश्यक

सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी निवेदनाद्वारे केली मागणी

पालकमंत्री उदय सामंत, आम. किरण सामंत यांना दिले मागण्याचे निवेदन

कोकणातील प्रसिद्ध देवस्थान व असंख्य भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या श्री देव धूतपापेश्वर मंदिराचे शासनाच्या माध्यमातून सुमारे ११ कोटी रूपये खर्च करून सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे पर्यटक व भाविकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे पर्यटक व भाविकांच्या सोयीकरीता देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण तसेच कॉक्रिटीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. कोकणातील जागृत देवस्थान, कोकण चे आराध्य दैवत, श्री देव धूतपापेश्वर, मंदिराकडे जाणाऱ्या, रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण करण्यासाठी चे निवेदन पत्र राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री राजापुरात आख्यान कार्यक्रमादरम्यान उपस्थित झाले होते, ही संधी साधत, या रस्त्याच्या रुंदीकरण आणि सुशोभीकरण करण्याची मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सादर केले.
राजापूर शहरातून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरून चापडेवाडी ते श्री धूतपापेश्वर देवस्थानकडे जाताना गणपती मंदिरापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण अत्यंत आवश्यक आहे. भक्तगणांना तसेच पर्यटकांना व त्यांच्या वाहनांना ये-जा करण्यासाठी, सद्यस्थितीत असलेला अरुंद रस्ता खूप त्रासदायक होत असून दोन वाहने समोरासमोरून आल्यानंतर कसरतीने चालवावी लागत आहे. तसेच महाशिवरात्र यात्रेवेळी संपूर्ण कोकण तसेच पंचक्रोशी जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यावेळी अरुंद रस्त्यामुळे भाविकांना निशान घाटी तसेच शाळेजवळ वाहने लावून सुमारे एक किलोमीटरची पायपीट करून मंदिराकडे जावे लागत आहे.
तसेच रिक्षा चालक, मोटार सायकल चालक किंवा चार चाकी वाहने यांना अतिशय त्रासदायक होत आहे. अरुंद रस्त्यामुळे, सहा चाकी वाहन एसटी किंवा आरामबस येत नसल्यामुळे पर्यटकांची सुद्धा गैरसोय होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून एक महत्वाची बाब म्हणून तात्काळ या रस्त्याचे रुंदीकरण व कॉंक्रिटीकरण गरजेचे आहे. तसेच एका बाजूने सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंती व कठोडे बांधणे गरजेचे आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने नवीन पद्धतीच्या स्ट्रीट लाईट आणि शोभेची झाडे लावून सौंदर्यात भर पाडल्यास पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल. तरी या सर्व मागण्या लवकरात लवकर मार्गी लावाव्या, अश्या मागणीचे निवेदन पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण उर्फ भैया सामंत यांना सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी दिले.

error: Content is protected !!