नॅशनल इंग्लिश मेडीयम स्कूल नडगीवे च्या हर्षण अडुळकर, वेद कदम, आराध्य सावंत यांची राज्यस्तरीय सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग च्या मान्यतेने मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो आणि फिटनेस अकॅडमी आणि श्री. संदिप रघुनाथ चौकेकर संस्थापक अध्यक्ष प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हा चिल्ड्रेन आणि सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा 2025 कणकवली येथील नगरवाचनालय सभागृहात पार पडली. या स्पर्धेत येथील नॅशनल इंग्लिश मेडीयम स्कूल नडगीवे च्या विद्यार्थ्यांनी 4 सुवर्ण पदक आणि 3 रौप्य पदक मिळवून नेत्रदीपक यश मिळवले आहे. चिल्ड्रेन गटात 26 किलो खालील गटात साई गुरव याने सुवर्ण पदक मिळवले तर सबजुनिअर गटात 29 किलो खालील गटात हर्षण अडुळकर याने सुवर्ण पदक, 32 किलो खालील वेद कदम याने सुवर्ण पदक आणि 38 किलो खालील आराध्य सावंत याने सुवर्ण पदक मिळवले आहे. तसेच 23 किलो खालील अदनान काझी, 35 किलो खालील रेयांश सावकार, आणि 44 किलो खालील वजणी गटात अर्णव राणे यांनी रौप्य पदक मिळवले आहेत.
यातील हर्षण अडुळकर, वेद कदम आणि आराध्य सावंत यांची 26 ते 28 डिसेंबर या कालावधीत कुडाळ येथे होणाऱ्या राज्य स्तरीय सब जुनियर तायक्वांदो स्पर्धेत साठी निवड झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्रशाले चे क्रीडा शिक्षक एकनाथ धनवटे व सुयोग राजपकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व विद्यार्थ्यांचे आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडिअम स्कूल नडगिवेचे अध्यक्ष श्री. मनोज गुळेकर, कार्याध्यक्ष श्री. रघुवीर राणे, सेक्रेटरी श्री. मोहन कावळे, सहसचिव श्री. राजेंद्र ब्रम्हदंडे, खजिनदार श्री. परवेज पटेल तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. निलम डांगे तसेच सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!