कुडाळ रोटरी क्लबचा २९ पासून कुडाळचा रोटरी महोत्सव

इंडस्ट्रियल, फूड, ऑटो एक्स्पो स्टाॅलची पर्वणी

रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी महोत्सव 2025 चे आयोजन दि.29,30 व 31 डिसेंबर रोजी कुडाळ हायस्कूल मैदानवर करण्यात आहे. अशी माहिती फेस्टिव्हल प्रमुख सचिन मदने व रोटरी अध्यक्ष राजीव पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. या महोत्सवात इंडस्ट्रियल, फूड व ऑटो एक्स्पोचे विविध स्टाॅलची पर्वणी सिंधुदुर्गवासियांना अनुभवायला मिळणार आहे.
दर दोन वर्षांनी रोटरी क्लब ऑफ कुडाळ सरत्या वर्षांला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी 29,30 व 31 डिसेंबर ला भव्यदिव्य रोटरी फेस्टिव्हल आयोजित करत असते.यावर्षी होणा-या रोटरी फेस्टिव्हल मध्ये फूड, इंडस्ट्रियल स्टाॅल बुकींग साठी इच्छूकांनी एकनाथ पिंगुळकर 94220 54652 यांचेशी संपर्क करावा.तर विविध नामांकित कंपन्याच्या फोर व्हिलर व टू व्हिलर गाड्यांचा ऑटो एक्स्पो स्टाॅल बुकींगसाठी प्रमोद भोगटे 94226 33609 व अजिंक्य जामसंडेकर 97679 24059 नंबरवर संपर्क करावा.

29 डिसेंबर रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा

29 डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक 7.00 वा लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा वयोगट 5 ते 11 व 12 ते 16 वर्षे अशा दोन गटात आयोजित करण्यात आली असून याची नोंदणी दि 25 डिसेंबर पर्यंत 9325283384 व 9421238723 वर करावी.सदर नावनोंदणी 30 स्पर्धकापूरती मर्यादित असणार आहे.या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक स्पर्धकास आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

30 डिसेंबर रोजी इनरव्हिल पाककला स्पर्धा

30 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा कुडाळ हायस्कूल मैदानवर इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ आयोजित इनरव्हिल पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून नावनोंदणी 9405245369 व 94212 38523 या नंबरवर दि 25 डिसेंबर पर्यंत करावी.असे आवाहन करण्यात येत आहे.

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे होणार आयोजन

तीन दिवशीय रोटरी फेस्टिव्हल मध्ये करमणुकीचे विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक कलाकारांना संधी दिली जाणार आहे.
एकूणच रोटरी फेस्टिव्हलची जय्यत तयारी सध्या रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून सुरू असल्याची माहिती फेस्टिव्हल प्रमुख सचिन मदने व रोटरी अध्यक्ष राजीव पवार यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

error: Content is protected !!