कणकवलीतील विलास बिड्ये यांचे निधन

कणकवली शहरातील सर्व परिचित चेहरा व सदा हसतमुख व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले विलास धोंडू बिड्ये (77 कणकवली शिवाजीनगर) यांचे काल शुक्रवार 12 डिसेंबर रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कणकवली शहरातील काशीविश्वेश्वर मंदिरातील दानपेटी ची जबाबदारी विलास बिड्ये यांच्याकडे असे. कणकवली शहरात या दानपेटीच्या माध्यमातून देणगी गोळा करण्यासाठी ते निस्वार्थी भावनेने प्रामाणिकपणे काम करत. काशीविश्वेश्वर मंदिरातील तसेच भालचंद्र महाराज संस्थान मधील कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय व हरहुन्नरी पणे सहभाग असे. कणकवली शहरात माऊली या नावाने देखील त्यांना ओळखले जाई. सर्वांशी हसत बोलणे व मनमिळाऊ स्वभाव हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यांच्या पाश्चात पत्नी, तीन मुलगे दोन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. कणकवलीतील अनंत, नंदू व शिवा बिड्ये यांचे ते वडील होत. त्यांच्यावर आज शनिवारी दुपारी 12 वाजता कणकवलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.





