कुडाळ मुख्य बाजार पेठेतील धोकादायक पोल बदलले

नगरसेवक मंदार शिरसाठ ऑनफिल्ड

कुडाळ शहरातील विदयुत समस्यांबाबत शिवसेना व युवा सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भेट घेण्यात आली होती व कुडाळ शहरातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली होती. त्याला महावितरणाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्याचा भाग म्हणून गेल्या दिवसांमध्ये कुडाळ शहरांमध्ये धोकादायक पोल बदलण्यात आले तसेच सेफ्टी बॉक्स व इतर बरीच मेंटेनन्सची कामे देखील एमएसईबीच्या माध्यमातून करण्यात आली.
कुडाळ मुख्य बाजार पेठेतील काही पोल गंजल्यामुळे धोकादायक झाले होते व दुर्घटना होण्याची शक्यता होती, त्यापैकी सौभाग्य शृंगार समोरील व ग्यानु प्रसाद कॉम्प्लेक्स जवळील धोकादायक पोल आज महावितरणच्या माध्यमातून बदलण्यात आले. सदर कामामुळे व्यापारी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सदर काम होण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाठ, संतोष शिरसाठ, सुशील चिंदरकर, अमित राणे, तेजू वर्दम, संदेश पडते, संदीप म्हाडेश्वर, दिनार शिरसाठ, गुरु गडकर यांनी विशेष प्रयत्न केले.

error: Content is protected !!