बांव गावचे नाव जिल्ह्यासह राज्यात जावे !

भाजप नेते विशाल परब यांनी व्यक्त केली इच्छा : भाजप बांव पुरस्कृत, सचिन स्पोर्ट आयोजित बांव प्रीमिअर लीग २०२३ क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न: सिद्धेश्वर बांव संघाकडे विजेतेपद, सिद्धेश्र्वर इलेक्ट्रिकल्स संघ उपविजेता

कुडाळ : भारतीय जनता पार्टी, बांव पुरस्कृत, सचिन स्पोर्ट आयोजित बांव प्रीमिअर लीग २०२३ भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत पंकज कदम-वैभव परब यांच्या मालकीच्या सिद्धेश्वर बांव संघाने विजेतेपद पटकाविले. तर उमेश वेंगुर्लेकर यांच्या मालकीचा सिद्धेश्र्वर इलेक्ट्रिकल्स हा संघ उपविजेता ठरला. यावेळी विजेत्या संघाला रोख रुपये २५ हजार आणि आकर्षक चषक आणि उपविजेत्या संघाला रोख रुपये १५ हजार आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तर अंतिम सामना सामनावीर : भूषण गावकर (सिद्धेश्वर बांव), उत्कृष्ट यष्टीरक्षक : विपुल करलकर (भवानी फायटर बांव), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक : तुषार आंगणे (सिद्धेश्वर बांव), उत्कृष्ट गोलंदाज : सुरज करलकर (सिद्धेश्वर इलेक्ट्रिकल्स), मालिकावीर : स्वप्नील आसोलकर (सिद्धेश्वर बांव) यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये बांव, बांबुळी, सोनवडे, पावशी, आंबडपाल, पणदूर, अणाव, डिगस येथील संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ काल भाजप युवानेते तथा प्रसिद्ध उद्योजक विशाल परब यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडला. यानंतर डबलबारीचा जंगी सामना बुवा गुंडू सावंत आणि बुवा संदीप लोके यांच्यात झाला. यावेळी कुडाळ तालुक्यातील डबलबारीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी या समारंभाचे प्रमुख पाहुणे भाजप युवानेते विशाल परब म्हणाले की, दरवर्षी अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केली जातात. पण यातून राज्यस्तरावर किंवा आयपीएल स्तरावर क्रिकेट खेळणारे खेळाडू तयार होणे आवश्यक आहे. आपण यासाठी बांव गावाला सर्वोतोपरी मदत करू शकतो, त्यासाठी येथील खेळाडूंनी परिश्रम घ्यावेत. बांव गावचे नाव जिल्ह्यासह राज्यात जावे, अशी आपली इच्छा असल्याचे भाजप नेते विशाल परब यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, तालुकाध्यक्ष दादा साईल, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, अभय परब, पप्या तवटे, रुपेश कानडे, पावशी शक्ती केंद्रप्रमुख आणि बांव माजी सरपंच नागेश परब, जयेश चिंचळकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख अरविंद करलकर, प्रशांत परब, विराज बावकर, उमेश वेंगुर्लेकर, वैभव परब, श्यामसुंदर सामंत, पंकज कदम, बांव बुथ अध्यक्ष आणि माजी उपसरपंच सुनील वेंगुर्लेकर, सोनवडे माजी उपसरपंच आणि बुथ अध्यक्ष सुधीर धुरी, प्रमोद कदम, संतोष मेस्री, आनंद परब, ओमकार सातार्डेकर, रोहित परब, मधुकर कांबळे, मयूर मेस्त्री, वर्षा गावकर, माजी सरपंच निलया परब, रवींद्र नेवाळकर, प्रमोद परब, बाळू सामंत, मकरंद सावंत, मिलिंद वेंगुर्लेकर, सुरज करलकर, अभय कदम, विजय गावकर, लक्ष्मण नेवाळकर, विराज बावकर, सत्यवान परब, सखाराम परब, रवींद्र नेवाळकर, मयूर मेस्त्री, योगेश कांबळे, वामन सारंग, वैभव परब, अभिषेक सावंत, यशवंत परब, बाळाजी परब, योगेश परब, प्रदीप परब, शेखर नेवाळकर, संजय परब, रोहित परब, दशरथ बावकर, शेखर बावकर, अरुण बावकर, मधुकर कांबळे, सखाराम सुतार, मयुरेश जाधव, सिद्धेश परब, हेमंत हडकर, संदेश नेवाळकर, सचिन मेस्त्री आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!