हनुमान जयंतीनिमित्त जयंतीनिमित्त नाटळ मध्ये ५ रोजी जंगी डबलबारी

कणकवली : नाटळ पांगमवाडी येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त बुधवार दिनांक ५ आणि गुरुवार दिनांक ६ एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त आज बुधवार दिनांक पाच रोजी रात्र नऊ वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आले आहे विनायक प्रासादिक भजन मंडळ मुंबई सांताक्रुज प्रसिद्ध बुवा श्रीधर मुनगेकर आणि गाभिरेश्वर भजन मंडळाचे प्रसिद्ध बुवा भजन सम्राट लक्ष्मण गुरव यांच्यामध्ये हा डबलबारीचा जंगी सामना होणार आहे
गाडी नऊ वाजता लघु रुद्र दुपारी एक वाजता लहान मुलांचे सुस्वर भजन दुपारी बारा वाजता आरती व महाप्रसाद संध्याकाळी सात वाजता दिंडी असा भरगच्च कार्यक्रम आज बुधवार पाच एप्रिल रोजी योजनात आला आहे
गुरुवार दिनांक सहा एप्रिल रोजी श्री हनुमान सेवा मंडळ ट्रस्ट नाटळ पांगमवाडी यांच्यावतीने मोफत नेत्र शिबिर तसेच नाक कान घसा मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे श्री हनुमान सेवा ट्रस्ट मंडळ नाटळ पांगमवाडी यांच्या वतीने हे शिबिर सहा एप्रिल रोजी योजनेत आले आहे दिनांक सहा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता श्री कलेश्वर नाट्य मंडळ नेरुर या दिग्गज मंडळाचा अजिंक्यतारा हा दशावतारी प्रयोग साद र केला जाणार आहे
या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री हनुमान सेवा मंडळ ट्रस्ट नाटळ पांगएम वाडी च्या वतीने दत्ता वाळके यांनी केले आहे
ब्युरो न्यूज / कोकण नाऊ / कणकवली