पंचशील विकास मंडळ खारेपाटण व सॅड्रिक डान्स अकॅडमी यांच्यावतीने खारेपाटण येथे दि.१५एप्रिल पासून नृत्य शिबिराचे आयोजन

कोरिओग्राफर सॅड्रिक डिसोजा व अभिनेत्री व डान्सर पल्लवी वैद्य यांची असणार उपस्थिती

खारेपाटण येथील सामाजिक शैशणीक,क्रीडा सांस्कृतिक शेत्रात अग्रेसर असलेल्या पंचशील विकास मंडळ खारेपाटण व सॅड्रिक डिसोजा डान्स अकॅडमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण यांच्या सौज्यन्याने शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण येथे दि.१६ एप्रिल २०२३ पासून १५ दिवसाच्या नृत्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
झी मराठी चॅनल वरील “एका पेक्षा एक ” डान्स या पर्वातील अंतिम.विजेता डान्सर / आणि चला हवा येऊ द्या चा कोरिओग्राफर स्पर्धक सॅड्रिक डिसोजा यांनी नुकतीच खारेपाटण येथे भेट दिली. दि.१५ एप्रिल ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत होणाऱ्या या नृत्य शिबिरात विविध प्रकारचे डान्स तज्ञ मार्गदर्शक यांच्याकडून मुलांना शिकविले जाणार आहेत.दि.१६ एप्रिल २०२३ ला फ्री वर्कशॉप ठेवण्यात आला असून दि.३० एप्रिल २०२३ ला डान्स वर्क शॉप मधील सहभागी मुलांचा भव्य शो चे आयोजन देखील करण्यात आले आहे. तसेच या नृत्य शिबिरा करीता ६ वर्षा पासून १० वर्षा पर्यंत एक गट व ११ वर्षापासून पुढे एक गट तसेच लेडीज स्पेशल एक गट असे नृत्य कार्यशाळेसाठी तीन गट पाडण्यात आले आहेत.या बरोबरच या शिबीरा करीता स्टार प्रवाह वरील – “तुझेच मी गीत गात आहे.” मालिकेतील अभिनेत्री व डान्सर “क्षमा ” म्हणजेच पल्लवी वैद्य विशेष उपस्थित राहून शिबिरातील सहभागी विद्यार्थ्याना भेट देणार आहे.
तरी या शिबिरात दशक्रोषितील जास्तीत जास्त शालेय विद्यार्थी व युवक युवती यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पंचशील विकास मंडळ खारेपाटण च्या वतीने करण्यात येत आहे.तर या शिबिरात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी विद्यार्थी व पालकांनी ८६२४८३००२७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क सधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!