नेरूर येथे हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन.

कुडाळ : प्रतिवर्षाप्रमाणे श्री. देव मारुती मंदिर नेरूर चव्हाटा येथे हनुमान जयंती उत्सव बुधवार ५ एप्रिल २०२३ व गुरुवार ६ एप्रिल २०२३ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे तरी सर्व भाविकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. बुधवार दिनांक ५ एप्रिल 2023 रोजी सायंकाळी ७:३० वाजता कै. शंकर मोरे प्रस्तुत मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे यांचा दशावतारी नाट्य प्रयोग सादर होणार आहे. गुरुवार दिनांक ६ एप्रिल 2023 रोजी हनुमान जयंती दिवशी पहाटे हनुमान जन्म, सायंकाळी ५ वाजता सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद आणि रात्री ७:३० वाजता श्री. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी या संपूर्ण कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे. असे आवाहन, कलेश्वर कला क्रीडा मंडळ नेरूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ब्युरो न्यूज / कोकण नाऊ / कुडाळ

error: Content is protected !!