चेंदवण हायस्कूल येथे आधारकार्ड अपडेशन कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे एकदिवसीय आधारकार्ड अपडेशन कॅम्पचे अआयोजन करण्यात आले होते. सौ रश्मी नाईक यांचेकडून मोफत आयोजित केलेल्या या कॅम्प मध्ये चेंदवण, कवठी, वालावल, चिपी आदी भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी सौ रश्मी नाईक, विभागीय समन्वयक कल्पेश पोयरेकर, शाखा प्रमुख तुषार नाईक, गटप्रमुख स्वप्नील चेंदवणकर, चेंदवण हायस्कूलचे मुख्याध्यापक माणिक पवार, अण्णा भरडकर, कवठी पोलिसपाटील विठ्ठल राणे, पोलिस पाटील सौ शुभश्री शृंगारे , आदी उपस्थित होते.
एकदिवसीय शिबीरात मुलांपासून जेष्ठांपर्यंत आधारकार्ड मधील नोंदी अद्ययावत करण्यात आल्या. यासाठी कोणाकडूनही शूल्क आकारण्यात आले नाही. हे शिबीर चेंदवणच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ रश्मी नाईक यांचेकडून सर्वांसाठी मोफत आयोजित करण्यात आले होते. उपस्थित लोकांनी सौ रश्मी नाईक यांचे आभार व्यक्त केले.





