कणकवली तालुका पत्रकार संघ समाजातील मानवतेचा मंच झाला

प्रांताधिकारी जगदिश कातकर यांचे प्रतिपादन
संघाने रक्तदान शिबिर आयोजित करीत समाजासमोर ठेवला आदर्श
कणकवली तालुका पत्रकार संघ हा नेहमीच बातम्यांचा मंच म्हटला जातो. आता तो जीवनाचा मंच झाला आहे. पत्रकार मंडळी समाजातील चांगल्या व वाईट घडणाºया घडामोडींचा बातम्या देतात. शासन व प्रशासनातील काही त्रुटी व उणिवा दाखविण्याचे काम प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी करीत असतात. कणकवली तालुका पत्रकार संघ रक्तदान शिबिराचा उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील मानवतेच्या वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी जगदिश कातकर यांनी केले.
कणकवली तालुका पत्रकार संघ, सिंधु रक्तमित्र संघटना प्रतिष्ठान, सिंंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील भवानी सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन जगदिश कातकर व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोसरकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी श्री. कातरकर बोलत होते. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ, कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे, प्रदेश प्रतिनिधी तथा माजी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, सचिव संजय सावंत, खजिनदार रोशन तांबे, सहसचिव दर्शन सावंत, उपाध्यक्ष नंदू कोरगावकर, उमेश बुचडे, सचिन राणे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, माजी उपाध्यक्ष रमेश जोगळे, माजी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई, अजित सावंत, विशाल रेवडेकर, सिंधु रक्तमित्र संघटनेचे मकरंद सावंत, जिल्हा रक्तपेढीच्या डॉ. भारती ठोंबरे आदी उपस्थित होते.
श्री. कातकर म्हणाले, कणकवली तालुका पत्रकार संघाचे रक्तदान शिबिर हा संवेदशील उपक्रम घेतला, याबद्दल मी संघाचे आभार मानतो. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्त हे कृत्रिमरित्या निर्माण करता येत नाही. त्यामुळे रक्ताचे महत्त्व मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. जीवनात प्रत्येक पैसा, प्रतिष्ठा, सन्मान मिळविण्याचा प्रयत्न करतो. मात्र, समाजाला काही देण्याचा विचार करीत नाही. कणकवली तालुका पत्रकार संघातील सदस्यांनी रक्तदान करून रक्ताची आवश्यकता असलेल्यांना त्याचे आयुष्य पुन्हा उभारण्याची संधी दिली आहे, असे कातकर यांनी सांगून तालुका पत्रकार संघाच्या रक्तदान शिबिर उपक्रमाचे कौतुक केले.
उमेश तोरसकर म्हणाले, कणकवली तालुका पत्रकार संघ नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. संघाच्या प्रत्येक उपक्रमाला जिल्हा पत्रकार संघाचे सहकार्य असते. कणकवली तालुका पत्रकार संघाच्या रक्तदान शिबिराचा उपक्रमाचा आदर्श जिल्ह््यातील अन्य तालुका पत्रकार संघांनी घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भगवान लोके, रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. तुम्ही आम्ही केलेल्या रक्तदानामुळे कुणाला तरी जीवदान मिळणार आहे. कणकवली तालुका पत्रकार संघाने रक्तदान शिबिर घेण्याचा नवा पायंडा पाडला आहे. यापुढील काळात हा पायंडा पुढे नेण्याचे काम संघाचे सदस्य करतील, असा विश्वास त्यांनी केला. रक्तदान शिबिर आयोजित करण्यामागील उद्देश श्री. लोके यांनी सांगून पत्रकार संघाच्या माध्यमातून फोंडाघाट येथे वृक्षारोपण, सावडाव धबधबा स्वच्छ मोहीम, मॅरेथॉन स्पर्धेसह राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आरंभी मान्यवरांचे स्वागत तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले. शिबिरात २७ जणांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना पत्रकार संघ, सिंधु रक्तमित्र, रक्तपेढी यांच्यावतीने प्रमापणपत्र व पुष्पगुच्छ त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्र वितरित करण्यात आली. आभार प्रदर्शन संजय सावंत यांनी केले.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी रक्तपेढीची प्रांजली परब, नितीन तुरनार, जोसेफ पिंटो, मयुर शिंदे, गणपत गाडगे, सागर सावंत, नितीन गावकर, संजय बाणे, तुळशीदास कुडतरकर, मिलिंद पारकर, सुधीर राणे, राजा दळवी, रंजिता तहसीलदार, राजन कदम, राजन चव्हाण, भास्कर रासम, योगेश गोडवे, विराज गोसावी, अनिकेत उचले, मयूर ठाकूर, हेमंत वारंग, सर्जेराव सिंघन, उदय दुधवडकर, पप्पू निमणकर, विनोद जाधव यांच्यासह व अन्य सदस्यांनी मेहनत घेतली.





