कणकवली रेल्वे स्थानकावर नागरकोईल एक्सप्रेसला थांबा मिळाल्याने रेल्वे मोटरमन चे स्वागत

कोकण रेल्वे समन्वय व संघर्ष समितीकडून स्वागत
विविध 4 रेल्वे गाड्यांना कणकवलीत मिळाला थांबा
कणकवली रेल्वे स्टेशनवर कोकण रेल्वे बोर्डाने कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती आणि कणकवली रेल्वे स्टेशन संघटना यांच्या मागणीची दखल घेऊन रेल्वेप्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यामुळे, हिसार-कोयंबतुर एक्सप्रेस , गांधीधाम , नागरकोइल एक्सप्रेस या ट्रेनना कणकवली स्टेशन ला थांबा मिळालेला आहे. त्यामुळे नागरकोईल एक्सप्रेस रेल्वे गाडी शनिवार दिनांक 08 नोव्हेंबर 2025 रोजी, सकाळी 6.30 वाजता दाखल झाली. या रेल्वेचे कणकवली रेल्वेस्थानकावर विविध संघटनांच्यावतीने हार घालत मोटरमन यांचा शाल , पुष्पगुच्छ देवून पेढे वाटत स्वागत केले.
कणकवली रेल्वे स्टेशन येथे कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती , कणकवली रेल्वे स्टेशन संघटना , कणकवली रेल्वे स्टेशन रिक्षा संघटना विष्णू समाज राजस्थान सेवा संघटना पाटीदार समाज संघटना , सिंधुगर्जना ढोल पथक यांच्यावतीने विविध गाड्यांना कणकवलीत थांबा मिळाल्याने स्वागत करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सुरेश सावंत, कार्याध्यक्ष प्रा. हरिभाऊ भिसे , संजय मालंडकर , सचिव सखाराम सपकाळ , पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके , बाळू वालावलकर , नितीन पटेल , दिनेश पटेल , दिपक पटेल, दिनेश मालविय , नरोना पटेल , संतोष सावंत, महानंदा चव्हाण , श्री. चौधरी , बाळा सावंत विविध संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच या संघटनांच्यावतीने हिसार-कोयंबतुर ही रेल्वे गाडी गुरुवारी रात्री 11.30 वाजता आली. त्यावेळी या सर्व संघटनांच्यावतीने त्या गाडीचेही स्वागत करण्यात आले.





