कणकवली स्वयंभू देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या

कणकवली चे ग्रामदैवत स्वयंभूचा वार्षिक जत्रोत्सव उद्या 5 नोव्हेंबर रोजी त्रिपुरी पौर्णिमा दिवशी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने स्वयंभू मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिर परिसर सजविण्यात आला आहे. जत्रोत्सवाच्या निमित्ताने रात्री दशावतारी नाटक होणार आहे. या जत्रोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.





