कै. बाळा वळंजू यांच्या स्मृतीदिनानिमित्त खारेपाटण शिवसेनेच्या वतीने प्रा. आ. केंद्र येथे रुग्णांना फळे वाटप

कै. बाळा वळंजू यांचा १६ वा स्मृतीदिना निमित्त खारेपाटण शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी कै. बाळा वळंजू यांचे चिरंजीव श्री निखिल वळंजू यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमाला शिवसेना कणकवली तालुका अध्यक्ष श्री. मंगेश गुरव, शिवसेना खारेपाटण विभाग प्रमुख श्री. गुरुप्रसाद शिंदे, युवा उद्योजक श्री. सुकांत वरूणकर, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री मंगेश ब्रम्हदंडे, खारेपाटण शिवसेना शहर प्रमुख श्री. सुहास राऊत, खारेपाटण प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
“सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना रुजवण्यात राणे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून कैलासवासी श्री. बाळा वळंजू यांचे नाव घेतले जाते. खारेपाटण विभागावर बाळा वळंजू यांचे विशेष प्रेम होते. व गोरगरिबांना रुग्णसेवा मिळवून देण्याच्या उद्दिष्टेने देखील त्याने खूप मेहनत घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले होते. अशा कार्यतत्पर समाजशील कार्यकर्त्याला आपण सर्वांनी मुकलो असे भावपूर्ण उदगार शिवसेना कणकवली तालुका प्रमुख श्री. मंगेश गुरव यांनी स्मृतिदिनी कार्यक्रमात आजरांजली व्यक्त करताना काढले.”
यावेळी कै. बाळा वळंजू यांच्या स्मृतींना उजाळा देताना कुणकवण गावच्या माजी सरपंच श्रीम. लक्ष्मी गजानन मेस्त्री यांनी गोरगरीब जनतेसाठी आदी अडचणी साठी व आरोग्यासाठी मदत केली असल्याचे सांगितले. तर खरोरं टाकेवाडी येथील श्रीम. वैशाली मोतीराम सावंत यांनी कै. बाळा वळंजू यांनी आपल्या कार्यकाळात माझ्या मुलीला नोकरी लावण्यासाठी प्रयत्न केले.त्याचे उपकार आधी कधीच विसरणार नसल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला खारेपाटण प्रा. आ केंद्राचे सर्व कर्मचारी व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!