वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचा त्रिसूत्री संगीत महोत्सव

7 ते 9 नोव्हेंबर पर्यंत कणकवली मध्ये आयोजन
पं. शौनक अभिषेकी यांच्या सह आघाडीच्या कलाकारांची उपस्थिती
गायन, वादन व नृत्य यांचे सादरीकरण
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशात वसंतराव आचारेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्थेचे विशेष असे स्थान आहे. गेली ४८ वर्षे संस्था ललित कलांचे संवर्धन, शिक्षण, प्रशिक्षणाद्वारे सांस्कृतिक चळवळ चालवित आहे. संगीत क्षेत्रातील त्रिसूत्री उपक्रम गेली २५ वर्षे आयोजित केला जात आहे. यावर्षी त्याचे २६ वे वर्ष असून या वर्षीचा त्रिसूत्री संगीत महोत्सव शुक्रवार ०७ नोव्हेंबर ते ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी ही या त्रिसूत्री उपक्रमातील पं. जितेंद्र अभिषेकी त्रिसूत्री संगीत महोत्सव तिन्ही दिवस साजरा होणार आहे.
यावर्षी वामनदाजी शास्त्रोक्त संगीत स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत राज्य व राज्या बाहेरील ३० गायक स्पर्धेकांनी स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. प्राथमिक फेरीतून त्यातील ११ स्पर्धक स्पर्धकांना अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आलेला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी ०७ नोव्हेंबर सकाळी ९:०० वाजता नगरपंचायत कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या हस्ते व सघनगान केंद्राचे गुरू पं. समीर दुबळे, पं. राम शंकर (बनारस), तबला प्रशिक्षण केद्रांचे गुरु चारुदत्त फडके यांच्या उपस्थितीत होणार आहे. संध्याकाळी ७:०० वाजता वामनदाजी शास्त्रोक्त संगीत स्पर्धेचा विजेता वाचे गायन होऊन संस्थेच्या सघनगान केद्रांची विद्यार्थीनी सानिका गावडे हिचे गायन झाल्यानंतर सुप्रसिद्ध कलाकार मा. पं. शौनक अभिषेकी यांच्या गायनाने सदर गायन मैफिलीची सांगता होणार आहे.
शनिवार ०८ नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक ९:३० वाजता सदर त्रिसूत्री उपक्रमातील रसग्रहण कार्यशाळा होणार असून सदरची कार्यशाळा सुप्रसिद्ध गायक व गुरु पं. राम शंकर (बनारस) हे घेणार आहेत. सदर कार्यशाळेत ‘रामाश्रय यांच्या बंदिशीं’ या विषयावर अभ्यास व मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा शनिवारी दोन सत्रात व रविवारी दुपारी १:०० वाजेपर्यंत अशा तीन सत्रात होणार आहे. रसग्रहण कार्यशाळा व संगीत महोत्सव प्रवेशिकासाठी इच्छूक प्रशिक्षणार्थी व संगीत प्रेमी रसि अधिक माहितीकरीता संस्थेच्या सहकार्यवाह सीमा कोरगांवकर (मो.९४२२३८१९७५) या क्रमांकावर संपर्क साधावा. याच दिवशी संध्याकाळी ७:०० वाजता संस्थेच्या तबला प्रशिक्षण केंद्रांचे विद्यार्थी कु. अर्थव पिळणकर व कु. वेदांत कुयेस्कर यांचे तबला वादन होऊन त्यानंतर पुणे येथील सुप्रसिद्ध बासरी वादन धवल जोशी पुणे (पं. केशव गिंडे) यांचे शिष्य यांचे बासरी वादन होऊन सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सुजाता गावडे यांच्या नृत्य अविष्काराने दुसऱ्या दिवसाची सांगता होणार आहे. रविवार ९ नोव्हेंबर सायंकाळी ७:०० वाजता सदर संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या मैफिलीचा प्रारंभनिलेश धाक्रस पुणे यांच्या गायनाने होणार असून सदर महोत्सवाची सांगता पं. राम शंकर (बनारस) यांच्या गायन मैफिलीने होणार आहे. या महोत्सवात हार्मोनियम साथ अदिती गराडे (पुणे) व स्वरुप दिवाण (कोल्हापूर) व तबला साथ चारुदत्त फडके यांची साथ संगत लाभणार आहे. तरी या महोत्सवात रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आव्हान संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.





