जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलचे वर्चस्व कायम

शालेय जिल्हास्तरीय १४ व १७ वर्षे मुले व मुली हॉलीबॉल स्पर्धा दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाट हायस्कूलच्या मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या दोन्ही गटात पाट हायस्कूलच्या चारही संघाने विजय संपादन करून पाट हायस्कूलची विजयी परंपरा कायम ठेवली. चारही विजय संघाची निवड आष्टा सांगली येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.
या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी स्टेजवर संस्था अध्यक्ष डी ए सामंत, संस्थेचे चेअरमन देवदत्त साळगावकर, संस्था सचिव विजय ठाकूर, संस्था संचालक अवधूत रेगे, राजेश सामंत, सुधीर मळेकर, दीपक पाटकर व प्रशालेचे मुख्याध्यापक आर एस हंजनकर, आर एस पर्यवेक्षक एस बी बोंदर हे मान्यवर उपस्थित होते. मान्यवराचा परिचय व स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक आर एस हंजनकर यांनी केले. तसेच सूत्रसंचालन प्रशालाचे सहाय्यक शिक्षक संदीप साळसकर यांनी केले. उपस्थित खेळाडूंना संस्थेचे सचिव विजय ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या व स्पर्धेचे उदघाटन संस्था चेअरमन देवदत्त साळगावकर यांच्या हस्ते झाले. या उदघाटन प्रसंगी सर्व संस्था पदाधिकारी उपस्थित होते.
पाट हायस्कूलच्या १४ वर्षे मुलांचा अंतिम सामना देवबाग मालवण संघाबरोबर झाला या सामन्यात पाट हायस्कूल संघाने तीन सेट पैकी दोन शून्य अशा फरकाने मालवण संघावर मात करत विजय संपादन केला. तर १४ वर्षे मुलीच्या संघाने अंतिम सामन्यात त्रिंबक हायस्कूल मालवण या संघावर मात करून विजय मिळवला व १७ वर्षे मुलींचा अंतिम सामना एस एम हायस्कूल कणकवली बरोबर झाला. या सामन्यात पाट हायस्कूलने कणकवली संघावर मात करून विजय संपादन केला. तर १७ वर्षे मुलांच्या संघाने वेंगुर्ले हायस्कूल वेंगुर्ले या संघावर अंतिम सामन्यात वेंगुर्ला संघाचा पराभव करून विजय मिळवला. पाट हायस्कूलच्या चारही संघानी विजय संपादन करून पाट हायस्कूलची विजयी परंपरा कायम ठेवली आहे. या चारही विजय संघाची निवड आष्टा सांगली येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. चारही संघातील खेळाडूस प्रशालेचे मुख्याध्यापक आर एस हंजनकर, क्रीडा शिक्षक एस एन पवार, डी ए कुबल व राष्ट्रीय खेळाडू रुपेश कोनकर, चारुहास वेंगुर्लेकर व आजी-माजी खेळाडू व पालक वर्ग दाजी रेडकर आणि ग्रामस्थ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेचे समालोचन आबा कोचरेकर व प्रशालेचे सहाय्यक शिक्षक जी ए केरकर यांनी केले. सर्व मान्यवराचे आभार प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. बोंदर सर यांनी मानले. राष्ट्रीय पंच श्री. जगदाळे सर व जिल्हा पंच इब्राहिम शेख, अमित हर्डीकर, ओंकार पाटकर, गीतेश राऊळ, शिवराम नांदोसकर, यशवंत कोळंबकर, राजेश गोवेकर यांनी स्पर्धेचे पंच म्हणून कामगिरी बजावली. सर्व खेळाडूचे कौतुक संस्था अध्यक्ष डी ए सामंत, संस्था चेअरमन देवदत्त साळगावकर, संस्था सचिव विजय ठाकूर यांनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





