कणकवली नगरपंचायत च्या अनुषंगाने शिंदेंच्या शिवसेनेचे बैठकांचे सत्र

उमेदवार चाचपणीच्या अनुषंगाने राजन तेलींकडून आढावा
महायुती म्हणून लढण्यावर भर, पण स्वबळाची देखील चाचपणी केल्याची माहिती
कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदेंच्या शिवसेनेकडून बैठकांचे सत्र सुरू असून, कणकवली नगरपंचायत निवडणुकीत पूर्ण ताकतीनिशी उतरण्याच्या अनुषंगाने नगराध्यक्षपदासहित नगरसेवक पदाच्या उमेदवारांची प्रभाग निहाय चाचपणी करण्यासाठी माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकतीच पुन्हा एक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये महायुती म्हणून लढण्याबाबत संकेत देण्यात आले असले तरी स्वबळाची देखील चाचपणी करण्यात आल्याचे समजते. प्रभाग निहाय उमेदवार निवडीच्या अनुषंगाने कामाला लागा अशा सूचना माजी आमदार राजन तेली यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. राजन तेली यांच्या निवासस्थानी ही बैठक घेण्यात आली. यामध्ये शिवसेना उपनेते संजय आंग्रे, कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, तालुका प्रमुख दामू सावंत, माझी शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, शेखर राणे, निलेश तेली, सुनील पारकर, बाळू पारकर, मेहुल धुमाळे, प्रिया टेमकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





