खारेपाटण महाविद्यालय यांच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग तसेच दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने,”किल्ले स्वच्छता मोहीम” उपक्रमातून रामगड येथे स्वच्छता मोहीम संपन्न

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण ,कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खारेपाटण यांच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने, दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने “पर्यावरण संवर्धन : किल्ले स्वच्छता मोहीम” हा उपक्रम राबविण्यात आला. ही मोहीम दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १.०० या वेळेत रामगड, कणकवली येथे पार पडला.

या उपक्रमाचे उद्घाटन दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. संतोष हसुरकर यांच्या वतीने त्यांचे सभासद श्री. मिलिंद चव्हाण व श्री. मधुकर विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. मिलिंद चव्हाण यांनी या मोहिमेचे मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती म्हणून कोल्हापूर स्वराज्यकार्य प्रतिष्ठानचे सभासद श्री. गणेश पवार व श्री.जीवन पाटील, तसेच दुर्गवीर प्रतिष्ठानचे सदस्य श्री.सिद्धेश मेस्त्री , श्री. गणेश मालंडकर, श्री. लक्ष्मण घाडीगावकर, श्री. ओंकार पालव श्री. विनय घाडीगावकर, श्री.शुभम घाडीगावकर श्री. प्रणय चव्हाण श्री. सागर परब श्री.विठ्ठल घाडीगावकर श्री.संकेत परब, श्री. साहिल गुरव श्री. यश राऊत, श्रीमती निलम पांचाळ , तसेच आजीवन अध्ययन विस्तार विभाग प्रमुख श्रीमती माधवी विजय पांचाळ व कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभागातून किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक व कचरा निर्मूलन केले. या माध्यमातून स्वच्छता, जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
महाविद्यालयातील शिक्षकवृंद आणि दुर्गवीर प्रतिष्ठानचे स्वयंसेवक यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.या प्रसंगी श्री.गणेश पवार , श्री. यश राऊत यांनी आपली मनोगते व्यक्त केली. श्रीमती माधवी पांचाळ “आपल्याकडे इतिहास असेल तर माणूस इतिहास घडवतो. म्हणून ज्या विश्वांदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले ते आपण जपले तर भावी पिढीला इतिहास सांगता येईल..”असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
ही मोहीम यशस्वीपणे पार पडावी व विद्यार्थ्यांना मोफत प्रवास घडविला ते आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. सिद्धेश सावंत, श्री.सूरज पाटील ,श्री. प्रशांत निकम व संदेश हर्याण यांनी मोलाचे सहकार्य केले.
शेवटी श्री. मिलिंद चव्हाण यांनी मुलांना संपूर्ण दुर्ग फिरवून त्या किल्ल्याची माहिती देत त्यांनी किल्ले स्वच्छता काळाची गरज आहे असे सांगून उपस्थितांचे आभार मानले आणि अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती व राष्ट्रप्रेमाची भावना दृढ व्हावी,असे मत व्यक्त केले. किल्ले स्वच्छता मोहीमेस कायम विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे विद्यार्थ्यांना आव्हान केले.

error: Content is protected !!