मोकाट गुरांचा तातडीने बंदोबस्त करा

ग्रामस्थांनी वेधले निवेदनाद्वारे ग्रामपंचायतचे लक्ष
मोकाट गुरांमुळे ग्रामस्थांना वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.यात अपघात होऊन वाहन चालकांना गंभीर दुखापतीला सामोरं जावे लागत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत चे लक्ष वेधले आहे.याबाबत आठदिवसात ठोस उपाययोजना न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनात माजी सरपंच मंगेश टेमकर,रुपम टेमकर,शैलेश मुणगेकर, यांच्या सह अन्य लोकांच्या सह्यांचे निवेदन शुक्रवारी ग्रामपंचायत आचराला देण्यात आले .
या निवेदनात मोकाट गुरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी योग्य ते नियोजन करून गुरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे या मोकाट गुरांमुळे अपघात होतात वाहन चालकांनाही इजा होते किंवा गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागते त्यामुळे त्यांना तालुका किंवा जिल्हा बाहेर स्वखर्चाने उपचारासाठी जावे लागत आहे यात जनावरांनाही इजा होत आहे किंवा मरण पावतात तरीसुद्धा या मोकाट गुरांचे मालक तो मी नव्हेच अशा भूमिकेत वावरत असल्याचा आरोप या निवेदनात ग्रामस्थांनी केला आहे सदर मोकाट गुरांमुळे शेती बागायती चे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे काही वेळेला गुरांना हाकलण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांनाही मोकाट गुरांकडून जखमी करण्याचे प्रकार घडले आहेत याबाबत मालकांना विचारणा केल्यास उडवाउडवीची किंवा अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे अशा गुरांच्या बंदोबस्तासाठी सरकारने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना नियम जारी केलेले आहेत.येत्या आठ दिवसात याबाबत निर्णय न झाल्यास मोकाट सोडलेल्या जनावरांबाबत आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.





