सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी ‘शेतकरी भवन’ मंजूर

१ कोटी ५२ लाख निधीची तरतूद

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्राची दखल

पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली मंजुरी

राज्यातील शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीला, नवीन “शेतकरी भवन” बांधण्यास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. हे शेतकरी भवन मंजूर व्हावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेत पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्याची तातडीने दखल घेत पणन मंत्री श्री रावल यांनी या शेतकरी भवन बांधण्यासाठी १ कोटी ५२ लाख ४४ हजार इतका निधी मंजूर केलेला आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या ९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार या शेतकरी भवनाच्या बांधकामासाठी रु. अक्षरी रुपये एक कोटी बावन्न लक्ष चव्वेचाळीस हजार चारशे अठ्याहत्तर इतक्या रकमेचा अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे.
सदर प्रकल्पासाठी पणन संचालनालय, पुणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने पत्रव्यवहार केला होता. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्राचा आधार घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्री जयकुमार रावल यांना पत्र दिले होते. आणि या पत्राची दखल मंत्री रावल यांनी घेऊन हे कृषी भवन मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वच संचालकांच्या माध्यमातून आणि सभापती तुळशीदास रावराणे यांच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांचे आभार मानले आहे.
या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्हात शेतकऱ्यांना मुक्कामासोबतच आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

error: Content is protected !!