आंजीवडे सातेरी मंदिर परिसर सुशोभीकरणसाठी ५ लाख निधी

आमदार निलेश राणे यांचे प्रयत्न

माणगाव खोऱ्यातील सर्वात दुर्गम आणि सर्वात शेवटचा गाव असलेल्या आंजीवडे गावाचे ग्रामदैवत श्री सातेरी मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजना क वर्ग अंतर्गत ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आंजीवडे गावच्या ग्रामदेवता मंदिर सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नारकर, विनायक राणे, दिलीप सावंत, यांचे कृष्णा पंधारे यांनी आंजीवडे गावाच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.

error: Content is protected !!