जिल्हास्तरीय कलाउत्सव स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूलचे घवघवीत यश…

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कलाउत्सव २०२५ या स्पर्धेमध्ये शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे. कसाल हायस्कूल कसाल येथे झालेल्या या स्पर्धेमधील विविध कला प्रकारांमध्ये जिल्ह्यातील बहुसंख्य माध्यमिक विद्यालये सहभागी झाली होती.
गायन एकल या कलाप्रकारामध्ये कु. प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिने मी पुन्हा वनांतरी हे बहारदार नाट्यगीत सादर केले. देशभक्तीपर समूहगीत गायन या प्रकारामध्ये कु. अनुक्षा अंकुश पतयाण, कु. तेजल सुभाष ठाकूर देसाई, कु. सानिया सतीश पवार, कु. दुर्वा दिगंबर राऊत या विद्यार्थिनींनी “करेंगे भारत निर्माण” हे गीत सादर केले. या गीताला प्रशालेचे संगीत शिक्षक संगीत अलंकार श्री. संदिप पेंडुरकर यांनी संगीतबद्ध केले आहे.
समूह वाद्यवादन या कला प्रकारामध्ये कु. आर्या अनिल मोसमकर, कु. आयुष प्रशांत मांगले, कु. वंश मारुती कानडे, कु. अनुष्का प्रसाद ठोसर व कु. सुमित ठोसर या विद्यार्थ्यांनी लोकसंगीत वाद्यमेळ वादन सादर करून परीक्षकांची वाहवा मिळविली. या कला प्रकारासाठी श्रीधर पाचंगे व प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री. मयूर जाधव यांचे विशेष सहकार्य मिळाले…
कथाकथन या स्पर्धेमध्ये कु. दूर्वा राजेंद्र चिके आणि कु. श्रुती ब्रह्मा जामसांडेकर यांचा द्वितीय क्रमांक आला.
प्रथम क्रमांक विजेत्या सर्व विद्यार्थ्यांची विभागीय स्तरासाठी निवड झालेली आहे.
या सर्व स्पर्धकांना प्रशालेचे संगीत शिक्षक संगीत अलंकार श्री. संदीप पेंडूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, सर्व संचालक मंडळ, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, मुख्याध्यापक श्री. संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन करण्यात आले .





