खारेपाटण तालुका निर्मिती, खारेपाटण रेल्वेस्टेशन प्लॅटफॉर्म उभारणी साठी नेहमीच सहकार्य -विनोद तावडे

खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर, उपसरपंच महेंद्र गुरव यांनी घेतली विनोद तावडे यांची भेट

भाजपाचे माजी मंत्री कुणकवण गावचे सुपुत्र विनोद तावडे यांनी नुकतीच आपल्या गावी गणपती निम्मित भेट दिली. यावेळी खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर,उपसरपंच महेंद्र गुरव यांनी विनोद तावडे यांची भेट घेऊन खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म बांधणे तसेच खारेपाटण तालुका निर्मिती अश्या विकासकामा संदर्भात चर्चा केली. खारेपाटण रेल्वेस्टेशन वर प्लॅटफॉर्म ची उभारणी करण्यासाहित, खारेपाटण नूतन तालुका निर्मिती संदर्भात आवश्यक ते प्रशासकीय सहकार्य करण्याचा शब्द भाजपा चे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितले. यावेळी सरपंच प्राची इस्वलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, संभाजी नगर गुरववाडी मित्रमंडळ अध्यक्ष (मुंबई ) सूर्यकांत गुरव, नितेश गुरव आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!