आचरा बाजारपेठ येथे पाणपोई चा शुभारंभ

आचरा–अर्जुन बापर्डेकर

वाढत्या उन्हाच्या झळा असह्य करत असताना बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना थंड पाण्याची सोय व्हावी या
सामाजिक भावनेतून आचरा बाजारपेठ येथे नंदकिशोर सावंत आणि येथील व्यापारी वर्गाच्या सहकार्याने नंदकिशोर सावंत यांचे भाऊ कै दिलीप सावंत आणि कै पार्वती ज्ञानदेव पवार यांच्या स्मरणार्थ पाणपोई सुरू केली आहे .त्याचा शुभारंभ त्यांची आई वासंती सावंत यांच्या हस्ते फित कापून केला गेला.यावेळी त्यांच्या सोबत विनय सावंत, चंदू मुणगेकर, गिरीश माटवकर,रविंद्र बागवे,अशेष पेडणेकर, आचरेकर,सिद्धांत हजारे ,सुनिल मुणगेकर, राजा जोशी यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. आपल्या बाजारपेठेत खरेदी साठी येणाऱ्या ग्राहकांना पोस्ट ऑफिस लगतच्या व्यापारयांनी रणरणत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर मंडप उभारण्याबरोबरच थंड पाण्याची ही सुविधा निर्माण करुन दिल्यामुळे ग्राहक वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

error: Content is protected !!