आंब्रड गावाने कायमच आमदार वैभव नाईक यांच्यावर प्रेम केले !

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे प्रतिपादन, विविध कार्यक्रमांनी आंब्रड येथे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा, शिवसेनेचे अतुल बंगे, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती
कुडाळ : कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आंब्रड शिवसेना आयोजित शिक्षक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका,मदतनिस, ग्रामपंचायत कर्मचारी या तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन काम करणा-या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. आमदार नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तोबा गर्दी झाली होती. परंतु, जिल्हाभर कार्यक्रम वाढदिवसाचे असल्याने व्यस्ततेअभावी आमदार नाईक कार्यक्रमस्थळी पोहचू शकले नाहीत.
यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यावर तुम्ही अतुट प्रेम करणारी मंडळी तुमच्या शुभेच्छा कायमच आमदार नाईक यांच्या पाठीशी आहेत म्हणूनच खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंब्रड गावाच्या विकासासाठी येथील पदाधिकारी मंडळी कायमच सहकार्य करीत आहेत असे सांगून पडते म्हणाले की, आज ही गर्दी आमदार नाईक याना शुभेच्छा देण्यासाठी झाली.या गर्दीवरुनच लक्षात येते की, शिवसेना आमदार वैभव नाईक यांची लोकप्रियता आता कोणीही थांबवू शकत नाही असेही पडते यांनी सांगितले. यावेळी अतुल बंगे, बबन बोभाटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आंब्रड सरपंच मानसी महेंद्र कदम, पोखरण सरपंच समिक्षा जाधव, कुंदे सरपंच रुपेश तायशेटे, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, आंब्रड उपसरपंच विठ्ठल तेली, उपसंघटक दीनकर परब, विभागप्रमुख विकास राऊळ, माजी पंचायत समिती सदस्य प्रविण भोगटे, माजी जि. प. सदस्य, कल्पिता मुंज, सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब मुंज, सामाजिक कार्यकर्ते सागर वाळके, ग्रामपंचायत सदस्य भिवा आंगणे, उपशाखा प्रमुख रमेश परब, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

