3 ते 15 ऑगस्ट अवयव दान जागृती अभियान पंधरवडा राबवणार

कणकवली रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम
3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा पंधरवडा अवयव दान जनजागृती अभियान म्हणून राबविणेत येणार आहे. त्याचे औचित्य साधून सोमवार दिनांक 11 ऑगस्ट 2025 सोमवार सकाळी 8.00 वाजता या विषयी जनजागृती रॅली काढणेचे निश्चित करणेत आले आहे. यामध्ये रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, तसेच कणकवली पेन्शनर्स असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक संघ कणकवली आणि कणकवली नर्सिंग स्कुल सहभागी होणार आहेत. सकाळी 8.00 वाजता पटवर्धन चौक कणकवली येथून रॅली निघून बाजारपेठ मार्गे कणकवली कॉलेज ग्राऊंड येथे संपेल व नंतर चहा पान होईल व त्यानंतर देहदान नेत्रदान तसेच अवयव दान यावर मार्गदर्शन करण्यात येईल. तरी आपण सर्वानी या अभियानाला उपस्थित राहावे व या राष्ट्रीय कार्यक्रमास इतरांना माहिती देऊन या रॅलीत सहभागी होणेस सांगावे ही विनंती. असे आवाहन कणकवली रोटरी क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.
 
	




