आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली जोरदार बॅनरबाजी

विविध स्तरातून अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
आज रात्री निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारण्याचा विशेष कार्यक्रम
कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, उपक्रम राबवले जात असताना विविध उपक्रमांच्या माध्यमातून आमदार वैभव नाईक यांचा लोकाभिमुख वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्ताने आज सकाळपासूनच आमदार वैभव यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. कणकवली येथील निवासस्थानी व विजय भवन येथील कार्यालयात अनेक कार्यकर्त्यांच्या, हितचिंतकांच्या शुभेच्छा आमदार वैभव नाईक यांनी स्वीकारल्या. यावर्षी कणकवलीत वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम देखील राबवण्यात आले. यावर्षी कणकवलीत ठिक ठिकाणी आमदार वैभव नाईक यांना शुभेच्छा देणाऱ्या बॅनर मुळे कणकवली शहरात राजकीय वातावरण निर्मिती देखील तयार झाली आहे. आमदार वैभव नाईक यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना सकाळपासूनच त्यांच्या कार्यालय व निवासस्थानी शुभेच्छा देण्याकरिता कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची व विविध स्तरातील मान्यवरांची रीघ लागली आहे. आज रविवारी संध्याकाळी आमदार वैभव नाईक यांच्या कणकवलीतील निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली