आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुंभवडे वसतीगृहातील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

विविध उपक्रमांनी केला युवा सेने तर्फे वाढदिवस साजरा
आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कै. शंकर महादेव सावंत विद्यालय कुंभवडे वसहतिगृहातील मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आज युवासेना तर्फे कुंभवडे हायस्कूल येथे करण्यात आले. यावेळी सरपंच सौ विजया कानडे, युवासेना तालुका समन्वयक तेजस राणे, गुरुनाथ पेडणेकर, माजी सरपंच सूर्यकांत तावडे, ग्रा. सदस्य श्री संदीप सावंत, ग्रा. सदस्य सौ मेघा सावंत, चेतन गुरव,सुरेश सावंत, चंद्रकांत सावंत, मातोस डिसोझा, मुखध्यापक सौ, राणे, शिक्षिका सौ. स्नेहल राणे व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी