घोडावत पॉलिटेक्निक तर्फे प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन

दीड लाखांपर्यंतची बक्षीसे
जयसिंगपूर : राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई पुरस्कृत पुणे विभागाअंतर्गत असलेल्या पॉलीटेक्निक मधील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी बुधवार 29 रोजी संजय घोडावत तंत्रनिकेतन येथे प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना व कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.
या स्पर्धेत पुणे विभागातील सांगली,सातारा, कोल्हापूर, सोलापूर,पुणे जिल्ह्यातून जवळपास 90 पेक्षा जास्त तंत्रनिकेतन शाखा सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक बक्षीस स्वरूप रु 1,00,000/- द्वितीय क्रमांक रक्कम 50,000/- सन्मानचिन्ह व मानपत्र देण्यात येणार आहे. बोर्डच्या नियमप्रमाणे एका तंत्रनिकेतन मधील एकच प्रोजेक्ट ग्रुपला यात सहभागी होण्यास परवानगी असते.या स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा.सागर चव्हाण काम पाहत आहेत.
उपस्थित होणाऱ्या संस्थेने आपले रजिस्ट्रेशन अकॅडेमिक मोनिटोरिंग पोर्टलला करावे असे आवाहन प्राचार्य विराट गिरी यांनी केले आहे.
या स्पर्धेस विश्वस्त विनायक भोसले व चेअरमन संजय घोडावत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.