नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिरात रामनवमी उत्सवाचे आयोजन

नेरूर येथील श्री. देव कलेश्वर मंदिरात बुधवार दिनांक 22 मार्च ते गुरुवार 30 मार्च या कालावधीत श्री देव कलेश्वर मंदिर येथे रामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. बुधवार दिनांक 22 मार्च ते बुधवार दिनांक 29 मार्च पर्यंत रोज रात्री ८ वाजता पुराण वाचन पालखीतून श्रींची मिरवणूक गायक दिनू मेस्त्री आणि रात्री १० वाजता कीर्तन बुवा श्री. ह. भ. प. नेवाळकर बुवा. यांचे कीर्तन सादर होईल. गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी श्री राम नवमी उत्सवा दिवशी सकाळी 11 ते 12:40 वाजेपर्यंत राम जन्मोत्सवावर कीर्तन. त्यानंतर पालखी मिरवणूक तसेच रात्री ८:३० वाजता पालखीतून श्रींची मिरवणूक गायक दिनू मेस्त्री. आणि रात्री १० वाजता पडदे भोरीप नाटक : कळसुत्री बाहुल्या अशा प्रकारचे विविध कार्यक्रम नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिरात रामनवमी उत्सवापर्यंत चालणार आहेत.तरी या सर्व कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन, देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी केले आहे.


कुडाळ / प्रतीनिधी

error: Content is protected !!