कणकवलीत अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली

अमली पदार्थ विरोधी घोषणा देत जनजागृती
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कणकवली शहरात कणकवली पोलीस व एस एम हायस्कूल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली काढण्यात आली. या रॅली ची सुरुवात कणकवली पटवर्धन चौक येथून करून सर्व्हिस रस्त्याने कणकवली बस स्थानक ते पटवर्धन चौक अशी काढण्यात आली. यावेळी नशा सोडा घर जोडा, अमली पदार्थ बंद झालेच पाहिजे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. यादरम्यान कणकवली पटवर्धन चौक येथे सिंधुदुर्ग जिल्हा अमले पदार्थ मुक्त झाला पाहिजे. यासाठी प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे. यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे, हवालदार विनोद जाधव, श्री पाटील, महिला पोलीस नाईक, विनया सावंत, स्वप्नाली कांबळे, देवेंद्र जाधव, एस एम हायस्कूलचे शिक्षक व एनसीसी चे विद्यार्थी उपस्थित होते.