एम व्ही डी कॉलेज प्रशासनाची जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

विद्यार्थ्यांनी न्याय देण्याची केली मागणी
अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा
कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील कॉलेजमध्ये फी भरून सुद्धा आम्हाला कोणत्याही सुविधा मिळाल्या नाहीत. कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी कर्मचारी वर्ग सुद्धा नाही. आम्हा सर्वांचा रिझल्ट सुद्धा परीक्षा देऊन व फी सक्तिने भरुन घेऊन दिला जात नाही. अशी तक्रार या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या तक्रारी त्यांनी म्हटले आहे, या कॉलेजमध्ये सावंत मॅडम आणि अकाउंट स्नेहल गावडे आहेत. पण त्यांच्याजवळ आम्ही तक्रार केली तर त्या तक्रार सुद्धा घेत नाही. ते सर्व काही चेअरमन विलास सावंत यांच्या जवळ आहे असं सांगतात. कॉलेज मध्ये प्राचार्य नसल्याने सर्व निर्णय हे कॉलेजचे चेअरमन विलास सावंत यांच्याजवळ आहेत. आम्हाला कॉलेजमध्ये कोणत्या सुविधा आणि फॅसिलिटी नाहीत पण आमच्याकडून पूर्ण फी घेतली जाते. पण आम्हाला शिक्षण व महत्त्वाच म्हणजे प्रॅक्टिकल सुद्धा होत नाहीत. कॉलेजमध्ये स्टाफ नसल्यामुळे जरी आम्ही डिग्री पूर्ण केली तर सर्टिफिकेट भेटण्याची गॅरंटी सुद्धा वाटत नाही. त्याकरिता आम्हा मुलांना कॉलेज बदलायचे आहे. परंतु कॉलेज मधून आम्हाला परीक्षा देऊन सुद्धा मार्कशीट दिली जात नाही आहे. आम्ही त्यासाठी कॉलेज मध्ये अर्ज सुद्धा दिला होता. पण कॉलेज कडून आम्हाला दिवसांवर दिवस दिले जात आहेत. यामुळे आम्हाला दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तारीख ही निघून जाईल. आणि आम्ही याच कॉलेजमध्ये अडकून बसू. कॉलेजच्या साध्या साध्या गोष्टी सुद्धा आम्हाला वेळेवर भेटत नसतील तर यास कोण जबाबदार? कॉलेजमधून आवश्यक कागदपत्र भेटत नसतील तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी कोणाकडे जाब मागावा.
तरी वरील कॉलेजच्या त्रासामुळे आम्ही विद्यार्थी मानसिक रित्या त्रासलेलो आहोत. म्हणून आम्ही पोलीस विभागाकडे तक्रारी केली. परंतु त्यामधून काही निष्पन्न होत नसल्यामुळे आम्ही मुलांनी आमच्यावरती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा मार्ग म्हणून आम्ही आपणास विनंती करत आहोत यातून मार्ग काढावा. नाहीतर आम्ही आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे. आम्हा मुलांची आपणाकडून एवढीच विनंती आहे की आम्हाला योग्य तो न्याय मिळावा. नाहीतर आमचं करियर वाया गेल्यात जमा होईल. सदर प्रकरणी कोणतीही जिवित वा इतर कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास त्याला वैयक्तिक संस्थेचे चेअरमन श्री. विलास सावंत यांना व्यक्तिशः जबाबदार धरण्यात यावे. असे या तक्रारीमध्ये म्हटले आहे. यावेळी या विद्यार्थ्यांसोबत युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके उपस्थित होते.