आंतरराज्य टोळीतील चौघांची दोन गुन्ह्यात जामिनावर मुक्तता

ॲड. अग्निवेश तावडे व ॲड. हितेश कुडाळकर यांचा युक्तिवाद
लक्झरी बसमधून बेंग लिफ्टिंग करून त्यातील दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीला एलसीबीच्या पथकाने पकडले होते. यातील चौघांनाही नांदगाव व ओसरगांव येथील गुन्ह्यांत अटक करण्यात आली होती. या अटक करण्यात आलेल्या मध्यप्रदेश येथील जाबीर निजामुद्दीन खान, जाहीर आयुब खान, रव्दर शब्दार हुसैन व रफिक नियाज खान या चौघांची जामिनावर मुक्तता झाली आहे. चारही आरोपींच्यावतीने ॲड. अग्निवेश तावडे व ॲड. हितेश कुडाळकर यांनी काम पाहिले.
एलसीबीच्या पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे नांदगाव येथील हॉटेल ग्रीनफिल्ड येथे या चौघांना ११ एप्रिल रोजी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून ब्रिझा कारसह बनावट नंबरप्लेटही ताब्यात घेण्यात आल्या होत्या. त्यांच्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीत अॅड. तावडे व अॅड. कुडाळकर यांनी केलेल्या युक्तीवादानंतर कणकवली येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी लटुरिया यांनी आरोपींची दोन्ही गुन्ह्यांमध्ये सशर्त जामिनावर मुक्तता केली.