आपले सेवा सरकार सर्व सामन्यांना दिलासा देणारे !

मंत्री नितेश राणे यांचे कलमठ ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उद्गार
कलमठ ग्रामपंचायत चे काम नेहमीच उल्लेखनीय
महाराष्ट्र AI दिशेने वाटचाल करत असताना. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायत येथे आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत स्तर) जिल्हास्तरीय ऑनलाईन सेवेच्या शुभारंभास राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी उपस्थित राहून आपले सरकार सेवा केंद्र सेवेचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी माणिक दिवे , प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, सरपंच संदीप मेस्त्री, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, सूर्यकांत वारंग,संजय कवटकर,शिंदे, ठाकूर, स्वप्नील चिंदरकर, प्रवीण कुडतरकर ,दिनेश गोठणकर, नितीन पवार, महेश लाड अनुप वारंग, पपू यादव , सचिन खोचरे,श्रेयस चिंदरकर, सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, नजराणा शेख, निसार शेख,आबा कोरगावकर, संतोष रेवंडकर, प्रवीण सावंत, स्वरूप कोरगावकर, समर्थ कोरगावकर, ऋत्विक राणे, प्रथमेश धुमाळे, मिलिंद चिंदरकर,आदी उपस्थित होते. राज्यातील सिंधुदुर्ग जिल्हा ai च्या दिशेने वाटचाल करताना आपले सेवा सरकार सारखे उपक्रम
सर्व सामन्यांचे दाखल्याचे विविध सेवा दाखल्यांचे काम सुकर होईल. तहसील कार्यालयातील फेऱ्या वाचतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत मध्ये सदर उपक्रम घेण्याचा आज कलमठ गावातून शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाला. पहिल्याच दिवशी ९ लाभार्थ्यांना दाखले वितरित करण्यात आले. या बद्दल पालकांनी देखील समाधान व्यक्त केले.निवेदन सूर्यकांत वारंग यांनी तर आभार सरपंच संदिप मेस्त्री यांनी मानले.