नागवे तंटामुक्त अध्यक्षपदी उमेश राणे यांची बिनविरोध निवड

उमेश राणे यांच्या निवडीबद्दल त्यांचे होतेय अभिनंदन

कणकवली तालुक्यातील नागवे तंटामुक्ती अध्यक्षपदी उमेश काशिराम राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . यापूर्वी या समितीचे अध्यक्ष असलेले स्वप्निल पाताडे यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच ही निवड प्रक्रिया ग्रामसभेत करण्यात आली .
श्री.उमेश राणे ( BA B.ed )हे कणकवली येथे LIC विमा प्रतिनिधी म्हणून कार्यरत करतात. तसेच आदर्श विद्यालय करंजे हायस्कूल येथे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आहेत .सुशिक्षित जागरूक नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्वत्र त्यांची चांगली ओळख आहे .
याप्रसंगी नागवे सरपंच सिद्धीका जाधव उपसरपंच महेंद्र कुडाळकर ग्रा.सदस्य संदेश सावंत सुलभा भोसले कश्मिरा गोठणकर तसेच ग्रामविकास अधिकारी श्रीमती. अमृता शेट्ये आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी उमेश राणे यांचे अभिनंदन केले.
तसेच गावातील सर्व नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!