खा.नारायण राणे 30 मे रोजी घेणार अतिवृष्टीचा आढावा

माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. शुक्रवार दि.३० मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधुदुर्गातील अतिवृष्टीचा आढावा ते घेणार असून जिल्ह्यात अतिवृष्टीने कोणत्या भागात नुकसान झाले याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतील आणि आवश्यक त्या सूचना करतील, असे नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

error: Content is protected !!