भारतीय जनता पार्टी व संदेश उर्फ गोटया सावंत व सौं संजना सावंत यांच्या वतीने मोफत भात बियाणे वाटप

भिरवंडे व गांधीनगर गावातील दीडशे शेतकऱ्यांनी घेतला लाभ
गावातील शेतकऱ्यांना अधिकाधिक चांगले भात पीक उत्पन्न मिळावे व शेतकरी शेती करण्यासाठी प्रोत्साहित व्हावे या हेतूनेच आम्ही चांगल्या प्रतीच्या भात बियांनांचे वाटप करीत असून शेतकऱ्यांनी यातून चांगले पीक घ्यावे असे आवाहन माजी जि प अध्यक्षा सौं संजना सावंत यांनी भात बियाणे वाटप प्रसंगी केले भिरवंडे गांधीनगर येथील सुमारे दीडशे शेतकऱ्यांना वाडा कोलम या जातीच्या भात बियांनांचे वाटप करण्यात आले तसेच लवकरच या शेतकऱ्यांना खत वाटप करणार असल्याचे सांगितले
निवृत्त पोलीस अधिकारी रमेश सावंत यांनी यावेळी बोलताना म्हणाले संदेश उर्फ गोटया सावंत व सौं संजना सावंत या उभयता गेली काही वर्षे शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करत आहेत त्यांची शेतकऱ्यानप्रति असलेली आस्था ही चांगली असून गावातील बरीच शी विकास कामे ही त्यांनी मार्गी लावलेली आहेत अशा काम करणाऱ्या व्यक्तींच्या मागे गावातील शेतकरी व ग्रामस्थ यांनी पाठीशी रहावे असे आवाहन केले यावेळी सांगवे माजी सरपंच सौ मयुरी मुंज, निवृत्त पोलीस अधिकारी रमेश सावंत, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, भिरवंडे सोसायटी माजी चेअरमन संतोष सावंत, शक्ती केंद्र प्रमुख श्रीकांत सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य विनय सावंत, प्रशांत कांबळे, राजू जाधव, मिलिंद बोभाटे, भिरवंडे माजी सरपंच बाबन लोबो, राजेश सावंत तसेच दोन्ही गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.





