आपुलकीची वागणूक देणारे व्यक्तिमत्व सेवानिवृत्त होणारे मंडल अधिकारी जनार्दन साईल यांचा पाटगाव सर्कल तर्फे सन्मान

पाटगाव सर्कल चे मंडल अधिकारी जनार्दन साईल हे सहकारयांशी आपुलकीने प्रेमाने वागणारे ,सर्व कुटूंबातील मंडळी असल्याची भावना असलेले व्यक्तीमत्व असल्याचे उद्गार पाटगाव सर्कल मधील सर्व तलाठी, कोतवाल यांनी मालपे येथे व्यक्त केले. पाटगाव सर्कल चे मंडल अधिकारी जनार्दन साईल हे 31मे रोजी सेवा निवृत्त होत आहेत. या निमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात उपस्थित सर्व तलाठी कोतवाल यांनी वरील भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांच्या सोबत तलाठी सुनिता मेस्त्री(धालवली, उंडील) प्रियांका गोसावी (नाद, पाटगाव) रमाकांत डगरे (गवाणे )
प्रथमेश आसोलकर (पोंभुर्ले) विलास धनवटे (विठ्ठलादेवी) समिक्षा राणे (फणसगाव) प्रियांका डवरे (कुणकवण),
कोतवाल प्रकाश घाडी ( धालवली) हर्षला राणे (उंडील) विवेक भोगटे (पाटगाव) लक्ष्मण घाडी (नाद) संतोष महाडिक (फणसगाव) त्यांचे कुटुंबिय पत्नी सौ तृप्ती साईल,मुलगी सौ.अक्षता साईल ,पुतण्या ऋतुराज साईल ,
पूजा साईल ,स्नेहल साईल ,राधिका साईल ,विशाल गुरव यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. यावेळी पाटगाव सर्कल मधील तलाठी कोतवालांतर्फे साईल यांची भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

error: Content is protected !!