युवा मोर्चाचा उद्या कणकवलीत अहिल्यादेवी युवा प्रेरणा संवाद मेळावा

मंत्री नितेश राणे, प्रभाकर सावंत, प्रमोद जठार यांची असणार उपस्थिती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त युवा मोर्चाचे आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकीय जयंती निमित्त युवा मोर्चा सिंधुदुर्ग वतीने युवा प्रेरणा मेळावा आयोजित केला असून ३० मे सकाळी १० वाजता प्रहार भवन कणकवली येथे आयोजन केल्याची माहिती युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी दिली. या बैठकीला मंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या सहित जिल्ह्यातील सर्व भाजपा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्काराने समाजातील यशस्वी महिलांचा देखील सन्मान होणार आहे. आज कणकवली येथे झालेल्या बैठकीत शहराध्यक्ष अण्णा कोदे,सरचिटणीस संतोष पुजारे, कणकवली तालुकाध्यक्ष अण्णा खाडये, वैभववाडी तालुकाध्यक्ष अतुल सरवटे, देवगड तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे,शहराध्यक्ष सागर राणे, समीर प्रभुगावकर, गणेश तळगावकर,मकरंद सावंत, प्रशांत राणे, अक्षय पाटील, चिन्मय तळेकर,मंदार सोगम,सिद्धेश वालावलकर, ऋतिक नलावडे,अवधूत तळगावकर,सचिन गुरव,बाबू राणे, नयन दळवी, सोमनाथ चव्हाण, मंदार मेस्त्री, श्रेयस चिंदरकर, रोहित ठाकूर, सर्वेश बागवे उपस्थित होते.

error: Content is protected !!