युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने STS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने ISRO सफर

युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा २०२५ मधील 4 थी,6वी व 7 वी या प्रत्येक इयत्तेतील सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता यादी तील प्रथम पाच अशा पंधरा गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरुपात दिनांक ११जून ते १४ जून २०२५ या कालावधीत विमानाने शैक्षणिक सहल ( ISRO ) भेटीसाठी नेण्यात येणार आहे.
*या सहली दरम्यान
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था, बेंगळुरू
- विश्वेश्वरय्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान संग्रहालय
- सेंट फिलोमेना चर्च
- मैसूर प्राणीसंग्रहालय (झू)
- मैसूर मत्स्यालय (एक्वेरियम)
- मैसूर राजवाडा
- वृंदावन उद्यान
- श्रीरंगपट्टणम येथील श्री रंगनाथस्वामी मंदिर
- इस्कॉन मंदिर विद्यार्थी*
यासह दक्षिण भारतातील पर्यटन स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत
या सहलीचा प्रारंभ बुधवार दिनांक ११ जून २०२५ रोजी सकाळी ७:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन होईल.
युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मा.सौ संजना संदेश सावंत आणि संस्थापक अध्यक्ष मा.श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या संकल्पनेतून या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे या सहलीमुळे शालेय विद्यार्थ्यांना विमान प्रवासा सोबतच भारतीय अंतराळ संस्था, व दक्षिण भारतातील पर्यटन स्थळांना भेट देता येणार आहे.
विमानाने इस्रो सफारी साठी निवड झालेली 4 थी 6 वी 7 वी इयत्ते मधील टॉप 5
इयत्ता 4 थी
1) पियुष लाड 186 नेरुळ शिरसोस
2) स्वरा गुरव 182 अजगनी नंबर 1
3 ) रेयांश कोळसुलकर 182 वेंगुर्ला न. 3
4) रुंदा आवडन 180 आरोंदा मानसी
5) आराध्य आपटे 180 सावंतवाडी नं 2
इयत्ता 6 वी
1) रुद्र पिकुळकर 184 जवाहर नवोदय विद्यालय सांगेली
2) प्रारब्ध बर्डे 184 कुडाळ हायस्कूल कुडाळ
3) वेदा राऊळ 184 सावंतवाडी न. 4
4) डेलिशा सावंत 184 एस एम हायस्कूल कणकवली
5) अंजली भोसले 180 एस एम व्ही. एम पडेल
इयत्ता 7 वी
1) आदित्य प्रभूगावकर 184 ए एस डी टोपीवाला हायस्कूल मालवण
2) पार्थ वजे 172 कुडाळ हायस्कूल कुडाळ
3)सुरभी सावंत 172 सावंतवाडी नं 4
4) विराज कल्याणकर 170 कणकवली न 3
5) रेवण राऊळ 170 एस एन एम विद्यालय खारेपाटण
यावर्षापासून रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा गुणवत्ता यादी तील निवडक विद्यार्थ्यांना ईस्त्रो सफरीत समाविष्ट करण्यात येणार आहे.
पुढील वर्षी ही परीक्षा 18 जानेवारी 2026 रोजी 11 ते 1 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे
अधिक माहितीसाठी परीक्षा प्रमुख श्री सुशांत मर्गज सर 9420206326 यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





